एखादं चांगल वचन ऐकलं ,वाचलं की आपल्यामधे एक वेगळा हुरूप येतो.काही काळ का होईना आपण सक्षम असल्याची जाणीव स्वतःमध्ये निर्माण झाल्याचं जाणवतं.पण ही स्थिती टिकवावी कशी याचं सूत्र काही आपण शिकू शकलो नाही.लटपटणे , लडबडणे हा जणू काही आपला मूळ स्वभाव असल्यासारखे आपण छोट्याशा कठिन प्रसंगात ही दाखवून देतो.आपण आपल्यातील काय तत्व सिद्ध केलं पाहिजे आणि यातुन प्राप्त सकसतेची नेहमीच आराधना केली पाहिजे असा ठशीव प्रयत्न करण्यात आपण कमी पडलो आहोत.आपलं पान पदार्थांनी गच्च भरलं आहे पण शरीराची नेमकी योग्य गरज भागवणारं अन्न काय आहे हे इतक्या दिवसाच्या अनुभवाने आपण समजू शकायला हवं.अन्यथा चटक मटक गोष्टी खाऊन आपण उदर भरण जरूर करतो पण त्यातील शरीराला फारसं लागतच नाहीत.जिभेला सुखावणारी गोष्ट पुढील सगळयाच प्रोसेसला छळणारी ठरते.तुम्ही खात असलेलं अन्न शरीर आणि मन दोघांनाही लागू पडायला हवं ही समज येणं सिद्धतेचं अंग आहे.अन्यथा पोतं भरतो आणि रिकामं करतो यालाच आपण जेवण समजत आलो आहे. सकसता सर्वच स्तरावर आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान राखून आहे .जेव्हा सिद्ध करण्याच्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो तेव्हा फक्त गुंतागुंत वाढते आणि आपण संबंध आयुष्य नुसते फसत जातो.
No comments:
Post a Comment