Tuesday, April 4, 2023

समज

एखादं चांगल वचन ऐकलं ,वाचलं की आपल्यामधे एक वेगळा हुरूप येतो.काही काळ का होईना आपण सक्षम असल्याची जाणीव स्वतःमध्ये निर्माण झाल्याचं जाणवतं.पण ही स्थिती टिकवावी कशी याचं सूत्र काही आपण शिकू शकलो नाही.लटपटणे , लडबडणे हा जणू काही आपला मूळ स्वभाव असल्यासारखे आपण छोट्याशा कठिन प्रसंगात ही दाखवून देतो.आपण आपल्यातील काय तत्व सिद्ध केलं पाहिजे आणि यातुन प्राप्त सकसतेची नेहमीच आराधना केली पाहिजे असा ठशीव प्रयत्न करण्यात आपण कमी पडलो आहोत.आपलं पान पदार्थांनी गच्च भरलं आहे पण शरीराची नेमकी योग्य गरज भागवणारं अन्न काय आहे हे इतक्या दिवसाच्या अनुभवाने आपण समजू शकायला हवं.अन्यथा चटक मटक गोष्टी खाऊन आपण उदर भरण जरूर करतो पण त्यातील शरीराला फारसं लागतच नाहीत.जिभेला सुखावणारी गोष्ट पुढील सगळयाच प्रोसेसला छळणारी ठरते.तुम्ही खात असलेलं अन्न शरीर आणि मन दोघांनाही लागू पडायला हवं ही समज येणं सिद्धतेचं अंग आहे.अन्यथा पोतं भरतो आणि रिकामं करतो यालाच आपण जेवण समजत आलो आहे. सकसता सर्वच स्तरावर आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान राखून आहे .जेव्हा सिद्ध करण्याच्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो तेव्हा फक्त गुंतागुंत वाढते आणि आपण संबंध आयुष्य नुसते फसत जातो.

         

RTE

https://kaushalyavikas.blogspot.com/2023/04/rte.html
     गोरगरिब कुटुंबातील मुलांना आरटीईचा मोठा आधार असून त्यातून त्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये मोफत पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण घेण्याची संधी या द्वारे उपलब्ध होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत आज.... पुढे संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... CLICK HERE...
https://kaushalyavikas.blogspot.com

WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/IUxRMYfLpP74itYfznZhWY

Shikshak Dhyey India
http://wvwnz.on-app.in/app/home/app/home?orgCode=wvwnz

ऐसे और पोस्ट देखने के लिए और कौशल्य विकास से जुड़ने के लिए क्लिक करें 👇👇

https://kutumbapp.page.link/FQ5kNrm1DmKpzFXo8?ref=AP13M

आकलनिय आणि अनाकलनीय

आकलनिय आणि अनाकलनीय गोष्टींच मिश्रण म्हणजे आयुष्य अशी एक व्याख्या आपल्याला करता येणं शक्य आहे.आपल्या अनुभवातुन आणि मेहनतीतून काही कोडी ,काही रहस्य उलगडत रहातात.काहींची उकल कळते पण काहींचा आदि आणि अनंत कळतच नाही.आपण प्रयत्नाने घडवतो एवढाच घटनाक्रम म्हणजे आयुष्य नव्हे. घडणं हा भाग आपल्या जगण्यात अधिक महत्त्वपूर्ण आहे.घडणं आणि घडत रहाणाऱ्या गोष्टींची नोंद आपल्याला ठेवणं तितकंस महत्त्वाचं नाही वाटंत.आपले प्रयत्न आणि त्याला नैसर्गिक शक्ती अथवा ईश्वरीय शक्तीची असलेली जोड याची बेमालूम गुंफण म्हणजे आपलं आयुष्य आहे.मी करतो माझ्याच मुळे होत आहे अशी आपली जर तार लागली असेल तर ही गुंफण लक्षात येणं जरा कठिनच आहे.नैसर्गिक अथवा ईश्वरीय शक्ती आपल्या सोबत आहे हा सहज स्वीकार आपल्या अंतर मनात असायला पाहिजे.आपण आपल्या प्रयत्नाने जे भौतिक साम्राज्य उभं करतो त्याचा दाता /निर्माता केवळ मी नाही असा विचार आपल्या आयुष्याला खरा स्थिरता देणारा विचार आहे.साक्षीभावाने आपल्या जीवनाकडे पहाणं आपल्याला जमायला हवं म्हणजे मग सर्व प्रकारच उताविळपण आणि भांबवलेपण आपोआप लोप पावत जाईल.यासाठी विचार करण्याच्या पद्धतीमधील आपली ताठरता कमी करत रहाणं हा आपल्या हातातील एक शाश्वत उपाय आहे हे आपण लक्षात घेऊयात .

Monday, April 3, 2023

तडजोडी

 आपल्या जीवनाचा योग्य विकास हे आपल्या जगण्याचं एकमेव ध्येय असायला हवं.व्यवहार्य जीवनामध्ये अनेक तडजोडी ,जुगाड करणं हा त्या - त्या प्रसंगाची अथवा परिस्थितीची मागणी असते तसे आपण करतही असतो आणि त्यातून निसटून निघत असतो पण निसटून जरी निघालो तरी त्यातून बाहेर पडणं मात्र आपल्याकडून होत नाही.खरतर हेच होणं सर्वाधिक आवश्यक आहे.नष्ठ होणाऱ्या अल्प अस्तित्वाच्या वस्तु - साधनांनी ,इच्छांनी आपलं जीवन वेढावून गेलं आहे आणि आपण यातून वर उठण्यासाठी जो आधार घेतो तो ही साधनांचाच घेतो ही साधनं आपल्याला अजूनच विषयरसात डुंबवतात. आकर्षण आणि प्रलोभन टाळण्यासाठी फार कष्ट करायचीही आवश्यकता नाही फक्त नश्वरनिष्ठ गोष्टीचं फोलपण आणि ईश्वरनिष्ठ गोष्टींच खोलपण लक्षात घेतलं की आपला प्रवास शाश्वत मार्गानेच होणार ही खात्री आपल्या मनाला होते.हा अलौकिक अनुभव कोणी तरी सांगतं म्हणूून येणारा नाही त्याची आस आपली आपल्याच असायला हवी.जसं की मातेच्या मनात बाळाला दूध पाजण्याचा भाव तयार होतो आणि तीला पान्हा फुटतो.ही केवळ जैविक क्रिया नाही अथवा तात्पुरतं भावविभोरं होणं नाही तर तो माता आणि बाळा मधिल कधीही न तुटणारा बंध आहे.मुल कीती ही मोठं झालं आणि माता कीती ही थकली तरी माझं बाळ जेवलं का याची आस मातेलाच असते.

      ईश्वरीनिष्ठेचा संस्कृती ,संस्कार याच्याशी संबंध नाही.कारण उष्ठी बोरे अर्पुन प्रभुला शबरी ने जणू ठाव पाहिला.संस्कृती आणि संस्कारांच्या निकषानुसार भिल्लीण शबरी कधीच टिकू शकली नसती पण शुद्ध भावाने ती प्रभुरामचंद्रासह अजराअमर झाहली.

Monday, August 10, 2020

आयुष्य

शब्दावर स्वार, लेखणीचा वार
शब्दच माझा आधार
डोळ्यात साठवतो स्वप्ने उद्याची
तमा मला ना कशाची
अस्तित्वाची लढाई, भविष्यावर चढाई
आयुष्याचा रस्ता तुडवताना
रक्ताळतील पाय
मरग्गगठ्ठा मागे सरणार नाय
सुख दुसऱ्याचे मजला प्यारे
दुबळ्यांसाठी वेचेल आयुष्य सारे
पाठीवर वार करणारे
गारद करीन सारे
जातीयतेची कट्टरता काढील मोडून
आपली करेन माणसं हात जोडून
सामाजिक ऋण फेडण्यासाठी
अर्पण करेन तन मन धन

कवी - मन कवी